Muhurta Shastra

Also See

Traits of 12 signs

Muhurta - Shastra

Understand the importance of auspicious days

शुभ मुहूर्ताचे महत्व का व काय असते ते खालील लेखा मधे सादर केलेले आहे...

मुहूर्त म्हटले की आपल्या मनात सात्विक भावना जागृत होतात. शुभ कार्याची सुरुवात, नवीन वास्तूत रहावयास जाणे, लग्न, मुंज आणि अश्याप्रकार्चे बरेच शुभ प्रसंग आपल्या आयुष्यात घडत असतात. आपण जे काही कार्य करणार आहोत त्यातून चांगलेच फळ मिळावे, ते चिरकाल टिकावे अशी त्यामागे भावनाही असते. मुहूर्त हे एक शास्त्र आहे. आपल्या पंचांग कर्त्यानी पंचांगात वेगवेगळे मुहूर्त नमूद केलेले असतात. ते कोणत्या करणाकरता विशेष फलदायी आहेत हेही लिहिलेले असते. आज मुहूर्तशास्त्राविषयी थोडी माहिती देत आहे.

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे 'Well begun is half well done' - कोणत्याही कामाची सुरुवात चांगली झाली तर मनातील संकल्प चांगल्याप्रकारे पार पडणार अशी आपल्याला खात्री वाटते.  मुल जन्माला आले की तिथूनच मुहूर्ताची सुरुवात होते. जन्मलेले बालक चांगल्या दिवशी आणि मुहूर्त वर जन्माला आले आहे का हे पहिले जाते.  बरसे, मुंज, लग्न इत्यादी गोष्टींकरता मुहूर्ताचा विचार केला जातो. ज्यांचा मनात देवाविषयी काहीही श्रद्धा नसते तेही कळत-नकळत  शुभवेळेचा विचार करतात. त्यातील हेतू एकच की  सुरु केलेल्या कामात उत्तम दर्ज्याच यश प्राप्त व्हाव. मुहूर्त शास्त्राचा पाया पंचांग असून पंचांगातील पाच अंग म्हणजे तिथी, वर, करण, नक्षत्र आणि योग ह्याचा मुहूर्त काढताना सखोलतेने विचार केला आहे. भारतीयांनी जतन करून ठेवलेली नक्षत्रांची परंपरा ह्यामध्ये प्रमुखाने विचारात घेतलेली आहे.

मूल जन्माला आले की त्याचे नक्षत्र पहिले जाते. ते शुभ नक्षत्रावर जन्माला आले आहे का हे पहिले जाते. अशुभ नक्षत्रावर किंवा वाईट ग्रहयोग असतील तर त्याचे परिणाम कमी करण्यासाठी शांतीकर्म केले जाते. पंचान्गातही जननशांती विषयी तिथी, योग व नक्षत्र दिलेले असतात. उदा. कृष्णचतुर्दशी  अमावस्या व क्षय तिथी शांती करण्यास योग्य मानल्या गेलेल्या आहेत. अश्विनीची पहिली ४८ मिनिटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेषा संपूर्ण नक्षत्र, मघा नक्षत्र प्रथम चरण, उत्तरा प्रथम चरण, चित्रा नक्षत्राचा पूर्वार्ध, विशाखा नक्षत्राचा चतुर्थ चरण, ज्येष्ठा आणि मूळ ही संपूर्ण नक्षत्रे, पूर्वाषाढा तिसरा चरण व रेवती नक्षत्राची शेवटची ४८ मिनिटे जन्मकाळी असल्यास जननशांती करतात. वेएघ्रुती, व्यतिपात, भद्रा (विष्टी), तसेच ग्रहणपर्वकाळ ही पण अशुभ मानली गेल्यामुळे त्याकरता शांत करतात. दग्ध, यमघंट व मृत्युयोग यापेकी करण असले तर शांती करावी.

पूर्वी विद्याभ्यासाचा आरंभ करताना सरस्वतीपूजन करून केले जाई. त्याकरताही मुहूर्त पहिला जाई.

गुढी पाडवा

गुढी पडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा. हिंदू धर्मामधे या दिवशी नवीन पंचांग किंवा नवे वर्ष सुरु होते. गुढी पाडवा हा साडेतीन मुहूर्ता मधला महत्वाचा मुहूर्त आहे. नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने या दिवशी गुढ्या आणि तोरण उभारून ब्रह्मध्वजाय नमः | असे म्हणून गुढीची पुजा करतात. पंचांगावरील गणपतीची पुजा आजच्या दिवशी करण्याची प्रथा आहे. आजचा संपूर्ण दिवस शुभ कार्याला चांगला असतो.